न्यूयॉर्क फॅशन वीक शोच्या रॅम्पवर अॅसिड हल्ल्याची पीडिता

reshma-banoo-qureshi
न्यूयॉर्क – अॅसिड हल्ल्यातून स्वतःला सावरत तर ती महिला आज एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून नावारुपाला येत असून ही महिला आहे रेश्मा बानो कुरेशी. तिला वयाच्या १९ व्या वर्षीच न्यूयॉर्क फॅशन वीक या जगप्रसिद्ध फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली. तिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या सहभागाने न्यूयॉर्क फॅशन वीकचीच शान वाढली असे म्हटले जात आहे.

तिच्यावर २०१४ मध्ये अॅसिड हल्ला झाला होता. तिचा चेहरा त्या हल्ल्यात जळाला आणि तिला एक डोळा देखील गमवावा लागला. यानंतर तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या अडचणींवर मात करित तिने आज हे यश संपादित केले आहे. अतिशय आत्मविश्वासाने रॅम वॉकवर चालून तिने उपस्थितांची मने जिंकली.

Leave a Comment