विमानात ‘गॅलेक्सी नोट ७’ वापरण्यास बंदी

samsung
नवी दिल्ली: विमान प्रवासादरम्यान सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ हा स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली असून या स्मार्टफोनचा चार्जिंग दरम्यान स्फोट झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात ही बंदी घालण्यात आली आहे. बंदीची माहिती देण्यासाठी हवाई वाहतूक संचालनालयाने यासंदर्भात एक लेखी परिपत्रकच काढले आहे. त्यामळे चेक इन लगेजमध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ घेऊन जाण्यास बंदी असणार आहे.

चेक इन लगेजमध्ये बंदी घालण्यात आली असली तरी, हवाई वाहतूक संचालनालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हॅंडबॅगमध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ ठेवता येणार आहे. हॅंडबॅगमध्ये प्रवासादरम्यान स्वतःजवळ ठेवता येणारी छोटी बॅग, पर्स आदिंचा समावेश होतो. मात्र, हॅंडबॅगमध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ बाळगता येत असला तरी, तो स्विच ऑफ करावा लागणार आहे. कारण विमानप्रवासादरम्यानस हॅंडबॅगमध्ये सोबत असलेला सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ स्विच ऑफ करणे नियमानसूनसार बंधनकारक असणार आहे, अशी माहिती वाहतूक संचालनालयाचे प्रमुख बी एस भुल्लर यांनी दिली आहे.

दरम्यान, या नियमाची अंमलबजावनी तत्काळ करण्यात आली असून, विमान प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिका-यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन ऍडमिनीस्ट्रेशननेही सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ वर बंदी घातली होती. चार्जिंग किंवा वापरादरम्यान होणारे स्फोट हेच कारण तेव्हाही या बंदीमागे होते. या बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कंपनीची पुरती नाचक्की झाली आहे.

Leave a Comment