रिलायन्सला ‘जिओ’मुळे तोटा होणार नाही

mukesh-ambani
नवी दिल्ली – काही तज्ञांचे जिओ दाखल केल्याने पहिल्या काही वर्षात कंपनीला तोटा सहन करावा लागणार असल्याचे मत रिलायन्सने फेटाळले असून कंपनीला जिओमुळे तोटा होणार नाही. भारतात नव्यानेच दाखल करण्यात आलेल्या दूरसंचार कंपनीला साधारण १७-१८ टक्के नफा होईल, असे मत समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

अंबानी यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत देशातील दूरसंचार बाजारपेठ, ग्राहकांचे अनुभव, रेग्युलेशन्स आणि भविष्यातील संधी याविषयीचे आपले मत व्यक्त केले. देशात प्रथमच या क्षेत्रात असणा-या एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहोत. तसेच या कंपन्यांनी ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. सध्या जिओचेही ग्राहक कॉल ड्रॉप समस्येला तोंड देत आहेत. मात्र लवकरच ही समस्या संपुष्टात येणार असून तिचे अस्तित्वही राहणार नाही, असे आपल्याला वाटते. ग्राहकांना कॉल ड्रॉपमुक्त सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले.

Leave a Comment