रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल अगदी साधा माणूस

urjit
कॅबिनेट सेक्रेटरीचा दर्जा असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेले उर्जित पटेल हे अतिशय साधे गृहस्थ असल्याचा अनुभव येऊ लागला आहे. पदाचा भार स्वीकारल्याच्या नंतर लगोलगच त्यांनी बैठकीसाठी जाताना अथवा विमानतळावर जाताना सिक्युरिटीने सोबत येण्याची गरज नाही असे स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे तर दुपारी लंचसाठी ते कार्यालयातून बाहेर पडून सरळ रस्त्यावरील गर्दीत सहज मिसळून जातात त्यावेळीही त्यांच्यासोबत सिक्युरिटी नसते असे समजते.त्यांचा शपथग्रहण समारंभही अगदी साधेपणाने व खासगी रित्या पार पडला होता.

नुकताच घडलेला किस्सा म्हणजे ते निती आयोगाच्या एका बैठकीसाठी जाणार होते तेव्हा त्यांच्या स्वागताची सर्व तयारी केली गेली होती. मात्र ते येण्याच्या अगोदरच एका आलिशान गाडीतून आलेल्या व्यक्तीलाच पटेल समजून त्यांचे स्वागत केले गेले मात्र थोड्याचे वेळात आलेल्या पटेल यांना सीआरपीएफच्या जवानांनी ओळखले नाही. ते आत जात असताना त्यांना त्यांचे ओळखपत्र मागितले गेले व त्यांनीही कोणतेही प्रस्थ न माजवता ओळखपत्र दाखवून हातात असलेल्या फायलींसह बैठकीत प्रवेश केला. अर्थात उपगव्हर्नरपदी असतानाही पटेल साधेपणाने वागत होते असेही त्यांचे सहकारी सांगतात.

रिझर्व्ह बँक गर्व्हनरची सिक्युरिटी हा एक प्रोटोकॉल आहे. हे लोक आर्मीतून निवृत्त झालेले असतात पण बँक कर्मचारी म्हणूनच त्यांची नेमणूक झालेली असते. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना असतो पण शस्त्र बरोबर बाळगले जात नाही. त्यामुळे ऊर्जित पटेल यांनी सिक्युरिटी बरोबर न बाळगायचा पायंडा पाडला तर भविष्यात गर्व्हनरला सिक्युरिटी बंदच होऊ शकेल असेही समजते.

Leave a Comment