यूनायटेड बेव्हरिजच्या अध्यक्षपदी विजय माल्ल्या कायम

vijay-mallya
बेंगळूरु – विजय माल्ल्या यांना यूनायटेड बेव्हरिज लिमिटेडच्या (यूबीएल) अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक मंडळाने घेतला असून माल्ल्या यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यास व्यवस्थापनामध्ये सहमती झाली. माल्ल्या यांचे समभाग ऍटॅच करण्याचा निर्णय अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) घेतला, तरी माल्ल्या अध्यक्ष कायम राहतील असे व्यवस्थापनाने म्हटले.

याप्रकरणी देशातील माजी प्रमुख न्यायाधीशांकडून यूबीएलने कायदेशीर मत मागितले होते. सदर माजी न्यायाधीशांनी माल्ल्या यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा सल्ला दिल्यानंतर व्यवस्थापकाने निर्णय घेतल्याचे यूबीएलचे संचालक चुग योगेंद्र पाल यांनी म्हटले. माल्ल्या यांच्या कर्जथकीत प्रकरणी संचालयनाने कंपनीची संपत्ती अथवा समभाग ऍटॅच केला नव्हता. यामुळे मल्ल्या यांना संचालकपदावरून हटविण्यात आले नाही असे पाल यांनी सांगितले. मल्ल्या यांची संपत्ती ऍटॅच करण्यात आल्यानंतर यूबीएल प्रमुखपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

Leave a Comment