ट्युरिंग मोनोलिथ आहे स्मार्टफोनचा बाप

turing-monolith
मुंबई : अॅपलने नुकताच आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस लाँच केले. या आयफोनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पण लवकरच बाजारात या आयफोनला टक्कर देण्यासाठी नवा स्मार्टफोन येत आहे. स्मार्टफोन कंपनी ट्युरिंगने नवा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. याचे फीचर्स पाहता हा स्मार्टफोन जगतात भूकंप घडवेल असे वाटते.

२०१८मध्ये ट्युरिंग मोनोलिथ हा स्मार्टफोन लाँच होणार असून या फोनचे फीचर्स जबरदस्त आहेत. यात १८ जीबी रॅम आणि ७८६ जीबी इनबिल्ट मेमरी असणार आहे. ६.४ इंचाचा स्क्रीन असणार असून यात ३ स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर असेल. यात तब्बल ६० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे. या स्मार्टफोननंतर कदाचित तुम्हाला वेगळा कॅमेरा घेण्याची गरज भासणार नाही.

Leave a Comment