जगाबरोबरच भारतात ‘५जी’चा प्रवेश

5g
बंगळूरू- जगाबरोबरच भारतातही एकाचवेळी दूरसंचार क्षेत्रातील पाचव्या पिढीतील तंत्रज्ञान (५जी) प्रवेश करेल असा विश्वास दूरसंचार सचिव जे. एस. दीपक यांनी व्यक्त केला. ते बंगळूरू येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटरनेट ऑफ थिंग्ज् इंडिया काँग्रेसमध्ये बोलत होते.

जगात २जी दाखल करण्यात आल्यानंतर भारतात प्रवेश करण्यासाठी २५ वर्षांचा कालावधी लागला होता. अमेरिका, युरोपमधील देशांत ३जी सेवा सुरू झाल्यानंतर भारतात हीच सेवा सुरू होण्यास एका दशकाची वाट पहावी लागली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर ४जी सुरू झाल्यानंतर भारतात येण्यासाठी ५वर्षांचा कालावधी दरम्यान गेला होता. मात्र तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख देशांत अत्याधुनिक समजले जाणारे आणि पाचव्या पिढीतील ५जी तंत्रज्ञान जगाबरोबरच भारतात येईल असे दीपक यांनी म्हटले. ५जी तंत्रज्ञानाने भारतातही एकाचवेळी प्रवेश केल्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताचे महत्त्व वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment