गेली ११८ वर्षे हे झाड आहे अटकेत

tree
कोणताही गुन्हा केला तर माणसाला अटक होते हे आपण जाणतो. कधी कधी वाघाला, सिंहाला, हत्तीला दंगा केल्याबद्दल अथवा हल्ला केल्याबद्दल अटक केल्याच्या बातम्याही येत असतात. मात्र झाडाला अटक केल्याची बातमी कदाचित कुणी ऐकलेली नसेल. पाकिस्तानातील लांडी कोटल आर्मी बेसमध्ये असे एक झाड आहे. गेली ११८ वर्षे हे झाड अटकेत आहे. भल्यामोठ्या साखळदंडांनी ते बांधले गेले आहे.

या मागची कथा अशी की ब्रिटीश काळात जेम्स स्क्वेड नावाचा एक अधिकारी या बेसवर होता. तो एकदा दारूच्या नशेत या झाडाजवळून जात होता तेव्हा त्याला हे भले मोठे झाडच त्याच्याकडे येत असल्याचा भास झाला. तो घाबरला व त्याने आपल्या शिपायांना त्वरीत या झाडाला साखळदंडाने बांधून अटक करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून या झाडाभोवती भारी भक्कम साखळ्या बांधल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर या झाडाजवळ आय अॅम अंडर अरेस्ट अशी पाटीही आहे.

स्वातंत्र्यानंतरही या झाडाभोवतीच्या साखळ्या काढल्या गेलेल्या नाहीत. ब्रिटीश राज्यातील क्रूरतेचे प्रतीक म्हणून त्या मुद्दाम तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment