स्वस्तात सोनेखरेदीची मण्णापुरमच्या लिलावात संधी

gold
मण्णापुरम फायनान्स लिमिटेडने त्याच्या १४१ शाखांतून २२ सप्टेंबरला गहाण सोन्याचा सार्वजनिक लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यात दिल्ली, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा व उत्तरप्रदेश अशा पाच राज्यातील शाखांचा समावेश आहे. यामुळे इच्छुकांना स्वस्तात सोनेखरेदीची संधी उपलब्ध झाली असून त्यासाठी पॅनकार्ड व आयडेंटिटी कार्ड जरूरी आहे. तसेच त्यासाठी २५ हजार रूपये रिझर्व्ह प्राईज अथवा २ टक्के रक्कम यातील जे कमी त्या रकमेचा डीडी १ दिवस अगोदर जमा करावा लागणार आहे.

मणीपुरम ही सोनेखरेदीसाठी कर्ज देणारी कंपनी आहे. त्यात ज्यांनी कर्ज घेतले आहे पण १२ महिने ईएमआय भरलेला नाही अशा ग्राहकांचे सोने लिलावात विक्रीला काढण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेकडून कंपनीला दिली जाते. अशा वेळी देशभरातील विविध शाखांतून असा लिलाव केला जातो. येथे सोने खरेदी करताना बाजारभावाशी त्याचा संबंध नसतो असेही समजते.

Leave a Comment