महागणार राजधानीसह दुरंतो आणि शताब्दीचा प्रवास

shatabdi-express
नवी दिल्ली: आता राजधानी, जनशताब्दी आणि दुरांतो या रेल्वेने प्रवास करणे महागणार असून तिकीटांच्या किंमतीत ९ सप्टेंबरपासून वाढ होणार आहे. एव्हिएशन सेक्टरच्या सर्वच रेल्वेंमध्येही फ्लेक्सी फेर सिस्टीम लॉन्च केले जाणार आहे. त्यामुळे या गाड्यांचा बेसिक फेअर दीड पटीने वाढणार आहे. केवळ फर्स्ट एसी आणि एक्झिक्युटिव्ह क्लासला यातून वेगळे ठेवण्यात आले आहे. ही भाडेवाढ रेल्वेला होत असलेल्या तोट्यातून सावरण्यासाठी करण्यात आली आहे. ही भाडेवाढ ७१ मार्गांवर तिन्ही प्रकारच्या १४२ रेल्वेंना लागू असेल.

अशा प्रकारचे डायनॅमिक फेअर सध्या विमानात द्याव लागते. ९ सप्टेंबरपासून पहिल्या १० टक्के जागांसाठी प्रवाशांना कोणतेही जास्त शुल्क द्यावे लागणार नाही, पण त्यापुढील प्रत्येक १० टक्के जागांसाठी ठराविक प्रमाणात जास्त शुल्क द्यावे लागेल. यातून फर्स्ट एसी आणि एक्झिक्युटिव्ह क्लासला वगळण्यात आले आहे. रेल्वेच्या या नियमामुळे आता प्रवासी विमान प्रवासाकडे जास्त वळतील असे बोलले जात आहे आणि सरकारला देखील हेच हवे आहे. जेणेकरून रेल्वेंवरचा दबाव जरा कमी होईल. यामुळे आता रेल्वे तिकीट बुक करणारे दलाल सुद्धा जास्त कमाई करू शकतील. सेकंड सीटींग, स्लीपर, सेकंड एसी आणि चेअर कारमध्ये सुरूवातीला अर्ध्या सीटांवर १० टक्के सीट बुक केल्यावर १० टक्के बेसिक फेअर वाढेल.

Leave a Comment