हे ४ व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य

pancard
मुंबई – सध्याच्या काळात पॅन कार्ड ही खुपच गरजेची गोष्ट असून गुंतवणुकीपासून ते नागरिकाच्या अधिवासाच्या पुराव्याच्या स्वरूपात पॅनकार्डाचा उपयोग होतो. मात्र, जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही काही काम पूर्ण करुच शकत नाहीत. तुम्हाला कोणकोणत्या व्यवहारात आपल्याला पॅन कार्ड आवश्यक आहे.

आयकर विभागाच्या नियमांनुसार, पॅनकार्ड ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची देवाण घेवाण होणार असेल तर त्यासाठी आवश्यक आहे. बँकांमध्ये पॅन कार्ड डिटेल्स दिल्यानंतरच पैसे जमा करु शकतो. पॅन कार्डची आवश्यकता ही ठराविक रकमेच्यानंतरच लागू होते.

तुम्हाला जर बँकेत ५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करायची असेल तर तम्हाला तुमच्या पॅनकार्डची माहिती देणे आवश्यक आहे. यासोबतच ५ लाख रुपये वर्षाला बँकेत जमा करत असाल तर त्यावेळीही तुम्हाला पॅन कार्ड गरजेचे आहे.

आता बँकांनी डिजिटल होत असलेल्या भारतात अर्थव्यवस्था आणखीन पारदर्शक करण्यासाठी पॅनकार्ड गरजेचे केले आहे. जर तुम्हाला बँकेत नवे खाते सुरु करायचे असेल तर तुम्हाला पॅन कार्डची माहिती देणे आवश्यक आहे. जर तुमचे अकाऊंट यापूर्वीच सुरु आहे तर तुम्हाला बँकेतील व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

जर तुम्ही ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचा ड्राफ्ट बनवत आहात किंवा चेकने व्यवहार करत असाल तर तुम्हाला पॅन कार्डची गरज नक्कीच लागेल. त्याचबरोबर क्रेडिट कार्डसाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे फार गरजेचे आहे. पॅन कार्ड शिवाय तुम्हाला कुठलीही बँक क्रेडिट कार्ड देणार नाही. मग, भलेही त्या बँकेत तुमचे खाते असो. ज्यावेळी तुम्ही क्रेडिट कार्डची मागणी कराल त्यावेळी तुम्हाला पॅन कार्डची माहिती देणे गरजेचे आहे.