सुझुकीचे गिक्सर बाईकचे स्पेशल एडिशन लॉन्च

suzuki
मुंबई – गिक्सर स्ट्रीट या बाईकचे स्पेशल एडिशन सुझुकी या कंपनीने भारतात लॉन्च केले आहे. Gixxer SP and Gixxer SF SP असे नाव या दोन शानदार नव्या बाईक्सना देण्यात आले आहे. या दोन्ही बाईक्स केवळ रिअर डिस्क ब्रेकमध्ये उपलब्ध आहेत. स्पोर्ट बाईक्सची आवड असणा-यांना ही बाईक्स आवडेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

या दोन्ही स्पोर्ट बाईक्स अतिशय आकर्षक करण्यात आल्या असून मरून कलरच्या सीट या दोन्ही बाईक्स उपलब्ध असतील. तर या दोन्ही बाईक्सना एलईडी टेल लॅम्प्स देण्यात आले आहेत. ह्या बाईक खासकरून तरूणांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. तरूणांमधील स्पोर्ट्स बाईकची वाढती क्रेझ बघता कंपनीने या बाईक्स त्यानुसार तयार केल्या आहेत.

रायडिंगची आवड असणा-यांना ह्या नव्या बाईक्स नक्कीच आवडेल कारण या बाईकचा लूक मॉर्डन आणि स्पोर्टी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ह्या बाईक अधिक आकर्षक वाटतात. The Gixxer SP या बाईकची किंमत ८० हजार ७२६ रूपयांना तर Gixxer SF SP ही बाईक ८८ हजार ८५७ रूपयांना उपलब्ध असणार आहेत.

Leave a Comment