‘मर्सिडीज-बेंझ’ची जीएलएस ४०० मॅट्रिक बाजारात दाखल

mercedes
नवी दिल्ली – आपले नवे पेट्रोल व्हर्जन ‘मर्सिडीज-बेंझ’ने बाजारात आणले असून आपल्या एसयुव्ही जीएलएसचे पेट्रोल व्हर्जन जीएलएस ४०० मॅट्रिक ही गाडी कंपनीने भारतात आणली आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत ८२.९० लाख रुपये असून मर्सिडीज जीएसएस ४०० एसयुव्हीची परदेशातून आयात करण्यात येणार आहे.

डीझेल इंधनाचा पर्याय असलेल्या वाहनांप्रमाणे ही गाडीही ७ आसनांची असून यात लेदर, अपहोल्स्ट्री आणि पॅनारोमिक सनरूफची सुविधा पुरविण्यात आली आहे. यात ८ इंचाचे टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम बसविण्यात आले आहे. ३.०लीटरचे व्ही ६ टर्बोचार्ज्ड पेट्रोलइंजन देण्यात आले असून ३३३ पीएसच्या पॉवर आणि ४८० एनएमचे टॉर्क आहे.

Leave a Comment