गणपती अॅपच्या माध्यमातून बाप्पाला भेटा

bappa
गणेशोत्सवात विविध गणपतींचे दर्शन घ्यावे अशी अनेकांची इच्छा असते मात्र गर्दी, वेळेचा अभाव, कधीकधी गणेश मंडळाचे नांव एकलेले असते पण ठिकाण माहिती नसते अशा अनेक अडचणींमुळे ही इच्छा पूर्ण करता येत नाही. यावर आता तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधला गेला आहे. अनेक गणेश मंडळांनी त्यांची अॅप्स भाविकांच्या मदतीसाठी तयार केली आहेत. त्यांचा वापर करून गणेशाचे केवळ दर्शनच नाही तर लाईव्ह आरतीत सहभागी होणेही भाविकांना शक्य होते आहे. त्यातील कांही अॅप्सची ही माहिती

बाप्पा मोरया- पुण्यातील गणेशोत्सव हा जगभराच्या औत्सुक्याचा विषय बनला आहे. बाप्पा मोरया हे अॅप पुण्यातील मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठीचे अॅप असून त्यात विविध २१ गणपतींची माहिती दिली गेली आहे. या गणपतींची ठिकाणे, तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नकाशासह यात उपलब्ध आहे.

खेतवाडीचा गणराज या अॅपमध्ये गणेशाची आरती, लाईव्ह दर्शन मंडळाला मिळालेली पारितोषिके, तसेच मंडळाकडे येण्याचा नकाशा व मंडळाची माहिती दिली गेली आहे.

मुंबईचा राजा अॅपमध्ये लालबागचा राजाचा फोटो, आरती, मंडळाचा इतिहास, जवळपासची ठिकाणे, पोस्ट ऑफिस, पोलिस स्थानकांचे तसेच हॉस्पिटलचे पत्तेही दिले गेले आहेत.

चिंचपोकळीचा चिंतामणी नावाच्या अॅपमध्ये मंडळाची माहिती, फोटो, लाईव्ह दर्शन, व्हिडीओ, गणेशाची गाणी अशी सुविधा आहे त्याचबरोबर या अॅपमध्ये भाविकांना त्यांनी काढलेले गणेशाचे फोटो अपलोड करण्याची सुविधाही दिली गेली आहे.

Leave a Comment