एलजीने आणला २ डिस्प्ले आणि ३ कॅमेरेवाला स्मार्टफोन

lg
मुंबई – आपला ‘एलजी व्ही २०’ हा स्मार्टफोन दक्षिण कोरियातील इलेक्ट्रॉनिक कंपनी एलजीने बाजारात लाँच केला असून अँड्रॉईड एन वर चालणारा हा स्मार्टफोन जगातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे. अँड्रॉईडच्या नोगट प्रणालीची घोषणा झाल्यानंतर ही ऑपरेटींग सिस्टीम सर्वात आधी ‘एलजी व्ही २०’ या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आली आहे.

या स्मार्टफोनची संपूर्ण बॉडी ही मेटलयुक्त असून या स्मार्टफोनला ५.७ इंचाचा क्युएचडी क्षमतेचा आयपीएस प्रकारातील मुख्य आणि आणखीन एक सपोर्टीव्ह डिस्प्ले डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा वापर नोटिफिकेशन्स आणि अलर्ट्स पाहण्यासाठी करता येणार आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे या फोनला एकूण तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. १६ मेगापिक्सल्स आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल्सचा फ्रँट कॅमेरा या स्मार्टफोनला आहे.

‘एलजी व्ही २०’ या स्मार्टफोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर देण्यात आला असून त्याची रॅम ४ जीबी आहे. यासोबतच इनबिल्ट स्टोअरेजसाठी ६४ जीबी मेमरी देण्यात आली आहे. ‘एलजी व्ही २०’ हे मॉडेल महिन्याच्या अखेरीस कोरियात मिळणार आहेत आणि त्यानंतर भारतात लाँच करण्यात येणार आहेत. यासोबतच कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.

Leave a Comment