इंडोनेशियाच्या चलनावर आहे बाप्पाचा फोटो

indonesia
मुंबई – कोणत्याही देवांचे फोटो भारतातील चलनावर नाही. उलट कुणाचे फोटो असावेत यावरून वाद सुरु आहे. देवाला भारतात एवढे मानले जात असूनही आपल्याकडील नोटांवर कोणत्याही देवाचा फोटो नाही. मात्र, या जगात असाही एक देश आहे ज्यांच्या चलनावर आपल्या लाडक्या गणरायाचा फोटो आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा देश जगातला सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया देश आहे.

इंडोनेशियाच्या देशातील २० हजाराच्या नोटेवर गणरायाचा फोटो आहे. या देशाची ८७.५ टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. केवळ तीन टक्केच हिंदू लोकसंख्या आहे. असे असूनही येथील नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो असण्याचे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. असे म्हणतात की, काही वर्षांआधी इंडोनेशियाची आर्थिक स्थिती बिघडली होती. तेथील राष्ट्रीय आर्थिक अभ्यासकांनी खूप विचार केल्यानंतर वीस हजाराची नोट जाहीर केली होती. ज्यावर गणपती बाप्पाचा फोटो आहे. लोकांचे असे देखील म्हणणे आहे की, त्यामुळे येथील आर्थिक स्थिती आता चांगली आहे. बरेच लोक असे मानतात की, इंडोनेशियामध्ये गणरायाला शिक्षणाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळेच येथील चलनावर श्रीगणेशाचा फोटो आहे. या देशात गणपतीच नाहीतर इंडोनेशियाच्या लष्कराचे मॅस्कॉट म्हणून हनुमानाची मूर्ती आहे. तिथल्या एका प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशनवर अर्जुन आणि श्री कृष्णाची मूर्ती लागली आहे. सोबतच घटोत्कच याचीही प्रतिमा बघायला मिळते.

Leave a Comment