अ‍ॅपलचा बहुप्रतीक्षित आयफोन ७ लॉन्च

iphone
मुंबई – अ‍ॅपलच्या आयफोन ७ बद्दल गेल्या काही दिवसांपूर्वीच अनेक चर्चा रंगल्या होत्या. फिचर्सबद्दल तर्क लावले जात होय. मात्र, हा आयफोन सर्वात चांगला असेल ही सुद्धा चर्चा रंगली होती. आयफोन ७ सोबतच अ‍ॅपल कंपनीने आयफोन ७ प्लस आणि अ‍ॅपल वॉच २ चे लाँचिंग झाले असून आता त्यामुळे आयफोन प्रेमी याला कसा प्रतिसाद देतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

या आयफोन ७ ची स्क्रीन ४.७ इंच इतकी आहे. तर आयफोन ७ प्लसची स्क्रीन ५.५ इंच इतकी आहे. तिन्ही आयफोन थ्रीडी टच असून या हँडसेट्सच्या ३२ जीबीच्या आयफोन ७ ची किंमत जवळपास ५३ हजार रुपये आहे. तर ६४ जीबीच्या आयफोन ७ ची किंमत जवळपास ६१ हजार रुपये आणि २५६ जीबीच्या आयफोनची किंमत ७१ हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्याचसोबत ३२ जीबीच्या आयफोन ७ प्लसची किंमत ६१ हजार रुपये, १२८ जीबीच्या आयफोन ७ प्लसची ६९ हजार आणि २५६ जीबीच्या आयफोन ७ प्लसची किंमत ७९ हजार रुपयांच्या जवळपास आहे.

अ‍ॅपल कंपनीच्या या तिन्ही स्मार्टफोनमध्ये ए१० प्रोसेसरसोबत बसवण्यात आले आहेत. आयफोन ७ मध्ये २ जीबी रॅम, आयफोन ७ प्लस आणि अ‍ॅपल वॉच २मध्ये ४ जीबी रॅम देण्यात आले आहेत. अ‍ॅपल प्लस आणि अ‍ॅपल वॉच २ मध्ये एकाच प्रकारचे सीपीयूचा वापर केला असून, क्लॉक स्पीडही आधीच्या आयफोनपेक्षा अधिक आहे. अ‍ॅपलचे हे सर्व आयफोन वॉटर रेसिस्टंट आहेत. या सर्व आयफोनमध्ये हेडफोन जॅकच्या त्याऐवजी नवीन लाइटनिंग पोर्ट देण्यात आले आहे.

आयफोन ७ला ४.७ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच आयफोन ७मध्ये हेडफोन जॅकची सुविधा देण्यात आली नसून वायरलेस हेडफोननेच आयफोन ७ कनेक्ट होणार आहे. आयफोन ७मध्ये सुधारित १२ मेगा पिक्सलचा कॅमेरा बसवण्यात आला असून, कमी प्रकाशातही चांगली स्पष्टता देणार आहे. यात ड्युएल लेन्स कॅमेरा बसवण्यात आला आहे. आयफोन ७मध्ये सर्वाधिक जलद चालणारी नवीन ए१० चिफ बसवण्यात आली असून, ३ जीबीचा रॅम देण्यात आला आहे. तसेच २.३७GHZ प्रोसेसर बसवण्यात आला आहे. थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने सेन्सिटीव्ही होम बटण देण्यात आल्यामुळे हा फोन ऑपरेटिंग करताना सुपरफास्ट चालणार आहे. या आयफोन १६ जीबीची किंमत ४३ हजारांच्या घरात आहे. तर ३२ जीबीच्या आयफोन ७ची किंमत ५३ हजारांपर्यंत असणार आहे.

Leave a Comment