मोटो जी४ प्ले विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर होणार उपलब्ध

moto
नवी दिल्ली: भारतात मोटो जी४ प्ले हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला असून या स्मार्टफोनची गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक आतुरतेने वाट बघत होते. हा स्मार्टफोन केवळ ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉन वेबसाईटवर मिळत आहे. याआधी मोटोरोलाने मोटो जी ४ प्लस आणि मोटी जी हे स्मार्टफोन लॉन्च केले आहे. आता लॉन्च केलेल्या स्मार्टफोनच्या कॅमेरामुळे हा फोन अधिक लोकप्रिय आहे. अ‍ॅमेझॉन वेबसाईटवर हा स्मार्टफोन आज रात्री १० वाजतापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

अमेरिकेत हा स्मार्टफोन सिंगल सीम लॉन्च करण्यात आला होता. भारतात हा स्मार्टफोन ड्युअल सीम लॉन्च करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत ८ हजार ९९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ४जी सेवा देण्यात आल्याने इंटरनेटचा फास्ट वापर होऊ शकतो.
मोटो जी ४ प्लेमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तर ऑपरेटींग प्रोसेसर हे १.२ गीगाहर्ट्स क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१० क्वाड-कोर आहे. तर २ जीबीची यात रॅम देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो ३०६ जीपीयू इंटिग्रेटेड आहे. या ४जी स्मार्टफोनचे स्टोरेज १६ जीबी असून १२८ जीबीपर्यंत ते एसडी कार्डने वाढवले जाऊ शकते.

या स्मार्टफोनमध्ये एफ/२.२ एपरचर असलेला ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. सोबतच ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. प्रायमरी कॅमेराला एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. तर यात १०८० पिक्सल एचडी व्हिडिओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात. मोटो जी ४ प्ले स्मार्टफोनमध्ये ४जी एलटीई, ब्ल्यूटूथ ४.१ एलई, वायफाय, मायक्रो यूएसबी आणि ३. ५ एम एम हेड-सेट अशा कनेक्टिव्हीटी देण्यात आल्या आहेत. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment