नव्या रंगात होंडाची सीबी हॉर्नेट १६०आर लाँच

honda
नवी दिल्ली : आपली स्पोर्टस् बाइक सीबी हॉर्नेट १६० आर प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडाने लाँच केली असून कंपनीकडून स्ट्रायकिंग ग्रिन आणि मार्स ऑरेंज अशा दोन आकर्षक कलरसह पाच स्पोक स्ल्पिट अलॉय व्हिलस्चे स्पोर्टी लूक देण्यात आले आहे. याबाबत कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंद्र सिंह गुलेरिया यांनी सांगितले की, ग्राहक या नव्या बाइकमध्ये स्पोर्टी ग्राफिक्स इंस्टॉल करु शकतील. या नव्या बाइकमधील ग्राफिक्स कंपनीच्या सर्व डिलर्सकडे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बाइकमध्ये १६३ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. या बाइकमध्ये नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. ही बाइक स्ट्रायकिंग ग्रीन आणि मार्स ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

Leave a Comment