दिवाळीपूर्वी आयफोन सेव्हन भारतात येणार

iphone
भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अॅपलचा नवा आयफोन सेव्हन व प्लस सॅन फ्रान्सिस्को येथील इव्हेंटमध्ये लाँच केला जात असून हा फोन दिवाळीपूर्वीच भारतात दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमात आयफोन सेव्हन सोबत अॅपल वॉच टू पण सादर केले जाणार असल्याचे समजते.

कंपनीने आयफोन सेव्हन व प्लस संदर्भातली कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र या फोनचे फोटो व फिचर्स पूर्वीच लिक झाल्याचा दावा केला जात आहे. त्यानुसार आयफोन सेव्हन प्लसला १०.१ आयओएस व ड्युअर कोर प्रोसेसर दिला गेला आहे. ए१० प्रोसेसर हा नवा प्रोसेसर आहे. या फोनला २ जीबी रॅम असल्याचेही समजते. आयफोन सेव्हन हा आत्तापर्यंतचा सर्वात सडपातळ फोन असल्याचे सांगितले जात आहे.त्याची जाडी अवघी ७१ मिमी आहे. त्याला वायरलेस इअरपॉड ईयरबँड दिले गेले आहेत. हे दोन्हीही फोन वॉटर रेझिस्टंट आहेत. सेव्हनसाठी १२ एमपीचा सेंसर कॅमेरा तर प्लस साठी ड्युयल रियर कॅमेरा दिला गेला असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment