ऑनलाईन मार्केटप्लेस स्नॅपडीलने दिवाळीची तयारी सुरू केली आहे. दिवाळीसाठी कंपनीने त्यांचे सेलर्स तसेच व्यापार्यांना १ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे कर्ज कॅपिटल असिस्ट या योजनेनुसार दिले जात असल्याचे कंपनीचे वरीष्ठ उपाध्यक्ष विशाल चढ्ढा यांनी सांगितले.
स्नॅपडील दिवाळीसाठी सेलर्सना देणार कर्ज
चढ्ढा म्हणाले, दिवाळीसारखे सण म्हणजे आमचे सेलर्स व व्यापार्यांना व्यवसाय वाढीची संधी असते. या काळात मागणी खूप वाढते पण कांही वेळा आर्थिक अडचणींमुळे व्यापारी अथवा सेलर्स माल खरेदीसाठी पुरेशी गुंतवणूक करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना हे लोन दिले जात आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच ते पुरेशा प्रमाणात मालाची साठवण करू शकतील. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यात त्यामुळे त्यांना अडचण येणार नाही. आत्तापर्यंत स्नॅपडीलने छोट्या मोठ्या व मध्यम उद्योगांना ४५० कोटींच्या कर्जाचे वाटप केले आहे असेही समजते.