नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी इंटेक्सने नवा अॅक्वा एस७ हा स्मार्टफोन लाँच केला असून ४जी व्हॉइस ओव्हर LTE च्या स्मार्टफोनची किंमत ९४९९ रुपये असणार आहे. तसेच हा स्मार्टफोन रिलायन्स जिओच्या वेलकम ऑफरसह मिळणार आहे.
इंटेक्सचा फिंगरप्रिंट सेंसरवाला अॅक्वा एस७ लाँच
या स्मार्टफोनमध्ये ५ इंच एचडी डिस्प्ले, १.३ गीगाहर्टझ् क्वाड कोर मीडियाटेक एमटी ६७३५ चिपसेट प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी माली टी ७२० जीपीयू, ३ जीबी रॅम, फिंगरप्रिंट सेंसर, ६.० अँड्राइड मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम, १२ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगा पिक्सलचा फ्रंट कॅमेरा त्याचबरोबर ४ जी, वाय-फाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ अशा कनेक्टीव्हीटी देण्यात आल्या आहेत.