आता पिंडदान देखील ऑनलाईन होणार

pind-daan
मुंबई : आता ऑनलाईन पितृपक्षात पूर्वजांना पिंडदान करण्याची सुविधा मिळणार असून पिंडदान आणि अंत्यसंस्काराची ऑनलाईन नोंदणी अलाहाबादसोबतच अनेक धार्मिक स्थळांवर करता येणार आहे.

दरवर्षी लाखो भाविक १७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या पितृपक्षासाठी विविध तीर्थक्षेत्रांवर जाऊन पिंडदान करतात. अनेकांना तीर्थक्षेत्रावर जाऊन पिंडदान करणे शक्य होत नसल्यामुळे ऑनलाईन पिंडदान सेवेमुळे अशा लोकांना मदत होणार आहे.

पितृपक्षात अलाहाबाद, हरिद्वार आणि गयासारख्या तीर्थक्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. तीर्थक्षेत्रावरील पंडितांच्या कामात वाढ झाल्याने त्यांनाही वेळ नसतो. बऱ्याचदा पंडितांना आपल्या पितरांची माहिती व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे पाठवली जाते. प्रवासापासून वाचण्यासाठी आणि व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना या व्हर्च्यूअल स्पेसचा आधार घ्यावा लागतो. या ऑनलाईन सुविधेमुळे पंडित आणि भाविक दोघांनाही फायदा होणार आहे.

Leave a Comment