वोडाफोनने लॉंच केला स्वस्त डेटा प्लान

vodafone
मुंबई – रिलायन्स जिओने ऐन गणेशोत्सवात आपले ४जी सिम लॉंच केल्यामुळे आगोदरच्या मातब्बर कंपन्या वोडाफोन, आयडीया, एअरटेल यांनीही रिलायन्सला टक्कर देण्याकरता सावध पावले उचलली आहेत. यात वोडाफोन आणि एअरटेल या कंपन्या आघाडीवर असून, वोडाफोनने तर आपल्या ग्राहकांसाठी खास सवलतीच्या दरात डेटा प्लान देणाऱ्या ऑफर लॉंच केल्या असून वोडाफोन या ऑफर घेऊन स्वत: ग्राहकांशी संपर्क साधत असल्यामुळे ग्राहकही खूश आहेत.

वोडाफोन आपल्या यूजर्ससाठी १०० रूपयांमध्ये एक महिन्यासाठी ३००एमबी ३जी/४जी डेटा देत आहे. डेटा लिमीट संपल्यानंतर युजर्सला 4P/10KB च्या दरा पैसे मोजावे लागतील. त्याचबरोबर २९९ रूपये आणि २५० रूपयांमध्ये १जीबीचे दोन वेगवेगळे डेटा प्लान दिले आहेत. याचा डेटा लिमिट संपताच युजर्सला 4P/10KB च्या दरात पैसे मोजावे लागतील. तसेच, त्याच २९९ रूपयांच्या प्लानमध्ये डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्सला 50P/MBच्या दरात पैसे मोजावे लागतील. ६५० रूपयांच्या प्लानमध्ये एक महिन्यासाठी ३ जीबी डेटा आणि ७५० रूपयांत ४जीबी डेटा देत आहे. ५जीबीवाल्या मासिक प्लानसाठी युजर्सला ८५० रूपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment