हिंदू मुलांची शाळा भरते मुस्लीम महिलेच्या घरी

school
आग्रा – एका मुस्लीम महिलेने जाती-धर्माच्या भींतीला तोडून आपल्या घरी गरीब हिंदू मुलांना निशुल्क शिकवण्याचे काम हाती घेतले असून तिने गरीब मुलांना शिकवण्यासाठी चक्क आपल्या घरातच शाळा भरवली.

सुरूवाती पासूनच समाजासाठी काहितरी करण्याची शहनाजला ईच्छा होती. तिने त्यासाठी आपल्या घरालाच शाळेचे स्वरूप दिले. तिचे घर पाच खोल्याचे आहे. हे घर आठवड्यातून सहा दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळेत बदलते. शहनाज येथे मुलांना हिंदी, इंग्लिश आणि उर्दू शिकवते. या शाळेत आजू-बाजूचे जवळपास दोनशे मुले शिकतात. शाहगंज मध्ये राहणारी शहनाज केवळ ९ वी पर्यंत शिकली आहे. परंतु, तिच्या शिकवण्याचे वेड बघून तिच्या शिक्षणाचा अंदाज देखील लावता येत नाही. आज तिने समाजा पुढे एक आदर्शच निर्माण केला आहे. ती जेथे राहते त्या भागात बहूसंख्य हिंदू तसेच गरीब लोकवस्ती आहे. शहनाज या मुस्लीम शिक्षीकेकडे येणारे सर्वं विद्यार्थी इतर धर्मातील आहे. या कार्यात शहनाजला तिचे सर्व कुटुंबीय सहकार्य करतात.