लेनोवोचे दोन स्मार्टफोन लाँच

lenovo
लेनोवो या चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने जगातील दोन नंबरचा ब्रँड बनतानाच आएएफए टेक फेअरमध्ये दोन नवे स्मार्टफोन सादर केले आहेत. पी टू व ए प्लस अशी त्यांची नांवे आहेत.

पी टू साठी ५.५ इंच एमोलेड फुल एचडी स्क्रीन, ३ व ४ जीबी रॅम, १६ व ३२ जीबी मेमरी व ती कार्डने वाढविण्याची सुविधा, ५११० एमएएच बॅटरी, फिंगरप्रिंट सेन्सर, एलईडी फ्लॅशसह १३ एमपीचा रिअर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड मार्शमेलो ओएस, फोर जी, एलटीई सपोर्ट अशी फिचर्स दिली आहेत. या फोनची किंमत अंदाजे १८५०० रूपयांच्या दरम्यान असून तो नोव्हेंबरपासून विक्रीसाठी येणार आहे.

ए प्लस साठी ४.५ इंची डिस्प्ले, १ जीबी रॅम, ८ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, २००० एमएएच बॅटरी, एलईडी सह ५ एमपीचा रियर तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड लॉलिपॉप ओएस अशी फिचर्स आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ अशी ऑप्शन्स आहेत. या फोनची किंमत साधारण ५२०० रूपये असून तो या महिन्यातच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment