मुस्लिम मुलांना हिंदू युवती शिकवत आहे कुराण!

pooja
आग्रा- येथील एक हिंदू मुलगी जाती-धर्माच्या भिंती तोडत मुस्लिम मुलांना कुराणाचे धडे देत आहे. या युवतीचे नाव पूजा कुशवाह (वय १८) असे आहे. पूजा ही बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून संजय नगर कॉलनीत राहते. संध्याकाळच्या वेळेस ती कॉलनीतील ३५ मुस्लिम मुलांना कुराणाचे धडे देते.

आम्हाला पूजा मॅडमकडून कुराणाचे धडे मिळत आहेत. त्या आम्हाला खूप छान शिकवतात. आमच्या त्या शिक्षिका असल्याचा मला अभिमान असल्याचे एका विद्यार्थीनीने सांगितले. गेल्या काही वर्षांपासून हिंदू-मुस्लिम नागरिक एकत्र राहात आहेत. काही वर्षांपूर्वी मुस्लिम वडिल व हिंदू माता असलेल्या कुटुंबात संगिता बेगम यांचा जन्म झाला होता. मुस्लिम मुलांना त्या कुराणाचे धडे देत होत्या. वैयक्तीक कारणामुळे त्यांनी शिकवणे थांबवले तेंव्हापासून पूजा या मुस्लिम मुलांना कुराणाचे धडे देतात.

पूजा म्हणाली, गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना कुराणाचे धडे देते. त्यांच्याकडून कोणत्याही माणधनाची अपेक्षा करत नाही व घेतही नाही. माझे घर छोटे असल्यामुळे बसायला जागा नाही. परंतु, परिसरात असलेल्या मंदिराच्या बाहेर परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवते. विद्यार्थ्यांना शिकवल्याने मोठे समाधान लाभत आहे.

Leave a Comment