आजपासून ‘जियो’ ४जी भरके

reliance
मुंबई – रिलायंसची बहुप्रतिक्षित जियो ४ जी सुविधा आजपासून संपूर्ण देशभरात सुरु होणार आहे. भारतीय ग्राहकांना सर्वच स्मार्टफोन ब्रँडसाठी जियो सीम सुरु करता येणार आहे. देशभरातील किमान दोन लाख दुकानांवर रिलायंस जियोच्या ४ जी सीमची विक्री होणार आहे.

३१ डिसेंबर २०१६ पर्यंत सर्व कॉल्स आणि डाटा (इंटरनेट) पूर्णपणे मोफत असणार आहे. यानंतर कॉल्ससेवा कायम मोफत राहणार असून केवळ इंटरनेट रिचार्जसाठी ग्राहकाला पैसे मोजावे लागणार आहे. यासाठी कंपनीने विविध डाटा प्लानची घोषणाही केली आहे.

रिलायंस जियोच्या डाटा प्लाननुसार, ५० रुपयांत १ जीबी डाटा मिळणार आहे जो इतर टेलिकॉम कंपनींच्या दरांपेक्षा फारच कमी आहे. रोमिंगच्या सर्व तक्रारी दूर करत रिलायंसने रोमिंग चार्ज पूर्णपणे काढून टाकण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता रोमिंग फ्री सेवेचा आनंद ग्राहक घेऊ शकणार आहे.

Leave a Comment