लाईफचा ३ जीबी रॅमवाला वॉटर ११ लाँच

lyf
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी भारताची टेलिकम्युनिशन कंपनी रिलायन्स रिटेलने वॉटर सिरीजचा नवा ४ जी स्मार्टफोन लाँच केला असून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइफ हा स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ८१९९ रुपये असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले, १.३ गीगाहर्टज् क्वाड कोर एमटीके प्रोसेसर, एआरएम माली टी ७२० जीपीयू ग्राफिक्स, ३ जीबी रॅम, १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज, ३२ जीबीपर्यंत – एक्सपांडेबल मेमरी, १३ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ६.० मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम, ४जी नेटवर्क त्याचबरोबर मल्टी अँगल व्यू मोड, ऑटो सीन डिटेक्शन, फेस डिटेक्शन, व्हिडिओ स्नॅपशॉट असे अनेक फिचर्स देण्यात्त आले आहेत.

Leave a Comment