रघुराम राजन निवृत्त

raghuram-rajan
मुंबई – आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी निवृत्ती स्वीकारली आहे. बँकेच्या वतीने एका कार्यक्रमात रविवारी त्यांना निरोप देण्यात आला. सरकारविरोधातील काही अप्रत्यक्ष विधानांमुळे त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. मात्र, बँकांना शिस्त लावणे, थकित कर्जाची वसुली, बँकेचे व्याजदर इत्यादी मुद्दय़ांवर त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. सरकारची इच्छाही त्यांनी काही निर्णय घेतांना विचारात घेतली नव्हती. त्यांची जागा रविवारपासून ऊर्जित पटेल यांनी घेतली आहे.

Leave a Comment