तब्बल ९ लाख रुपये ओला कॅबचे बिल

ola
हैदराबाद : ओला-उबेर कॅबचा वापर हल्ली रिक्षा-टॅक्सीला पर्याय म्हणून वाढू लागला आहे. या ओला-उबेरकडे चांगली तसेच किफायतशीर सेवा म्हणून पाहिले जाते.

मात्र हैदराबादमधील रतीश सेखर यांना ओला कॅबचा प्रवास चांगलाच महागात पडला. ओला कॅबमधून ४५० किमीच्या प्रवासासाठी त्यांना तब्बल ९,१५,८८७ रुपयांचे बिल आले आहे.

डेक्कन क्रोनिकलमध्ये आलेल्या बातमीनुसार, एका खाजगी कंपनीत जॉब करणारे सेखर यांनी हैदराबादहून निझामाबदच्या प्रवासासाठी ओला कॅब बुक केली. सकाळी ७.५७ मिनिटांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. संध्याकाळी ५.१६ ते निझामाबादला पोहोचले. हा प्रवास ४५० किमींचा होता. यासाठी साधारणपणे ५ हजार रुपयांपर्यत खर्च अपेक्षित होता. मात्र त्यांना जेव्हा बिल दिले गेले तेव्हा पाहून त्यांना धक्काच बसला. तब्बल ९,१५,८८७ रुपयांचे हे बिल होते. दरम्यान, ओलाच्या कर्मचाऱ्यांनी याची दखल घेत त्या प्रवाशाची माफी मागितली आणि या प्रकऱणात लक्ष घालू असे आश्वासन दिले.

Leave a Comment