ट्विटरची लॉर्ड गणेश इमोजी

emoji
गणेश चतुर्थी देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच व्हर्च्युअल जगही त्यात मागे नाही. गणेशचतुर्थीचे निमित्त साधून सोशल साईट ट्विटरने ४ सप्टेंबरला स्पेशल लॉर्ड गणेश इमोजी लाँच केली आहे. ही इमोजी १६ सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणेशोत्सवाच्या सांगता समारंभापर्यंत ठेवली जाणार आहे.

ट्विटरचे मिडीया प्रमुख विराल जनी म्हणाले आम्ही नेहमीच जनोत्सवात सहभागी होत असते. आपल्या अवतीभवतीच्या जगात जे चालले आहे त्याविषयी व्यक्त होण्याचे ट्विटर हे सर्वात चांगले माध्यम आहे आणि हे लक्षात घेऊनच आम्ही आमच्या लाखो युजरना आपल्या या उत्सवाबद्दलच्या भावना व्हर्च्युअल जगातही व्यक्त करता याव्यात यासाठी ही विशेष इमोजी सादर केली आहे. आमच्या या प्रयत्नाची युजरकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जात आहे. ४ सप्टेंबर पासून ते १६ सप्टेंबर पर्यंत ही इमोजी राहणार आहे.

Leave a Comment