आजच्या गणेशचतुर्थीला दुरूधरा महायोग

ganesh
आजची गणेशचतुर्थी दुर्मिळ अशा दुरधरा महायोगावर साजरी होत आहे. गेल्या शंभर वर्षात हा योग प्रथमच आला आहे व यापुढची आणखी ५० वर्षे तो येणार नाही असे ज्योतिषी सांगतात. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रामुळे हा योग येतो. कुंडीलीत चंद्राचे जे स्थान असेल त्यापासून दुसर्‍या व बाराव्या स्थानात सूर्य सोडून सर्व ग्रह येतात त्याला दुरूधरा योग म्हटले जाते.

यंदा चंद्र तुळेत आहे. त्याचवेळी १२ व्या स्थानात गुरू, बुध व शुक्र आहेत तर मंगळ व शनी दुसर्‍या स्थानात आहेत. या मुहूर्तावर केलेली सर्व कार्ये दीर्घकाळ टिकतात व अतिशय चांगली फळे देतात असा समज आहे. या मुहुर्तावर जन्मलेले बालक प्रसिद्धी मिळवते असेही सांगितले जाते. या मुहुर्तावर महत्त्वाची खरेदी तसेच महत्त्वाची कामे केल्यास ती फलदायी ठरतात असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. गणेशाचा जन्म मध्यानीचा मानला जातो. त्यामुळे मध्यान्हीला गणेशपूजेसाठी सर्वात उत्तम मुहूर्त आहे असे ज्योतिषांचे म्हणणे आहे.

Leave a Comment