स्वस्त झाला जीओफाय डिव्हाइस

jio
मुंबई – रिलायन्स समुहाने जिओ प्लॅन लॉन्च एकच धमाका करून टाकला. या नव्या प्लॅनकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. १ जीबी इंटरनेटसाठी केवळ ५० रूपये मोजावे लागणार असून लाईफ टाईम व्हॉईस कॉलिंग फ्रि देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत ग्राहकांसाठी ४जी इंटरनेट ते व्हॉईस कॉलिंगपर्यंत सर्व सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत. यासोबतच ही घोषणा करण्यात आली आहे की, रिलायंस जिओच्या रिलायन्स जिओफाय डिव्हाईसवर ९०० रूपयांची सूट देण्यात आली आहे. हे पोर्टेबल वायफाय हॉटस्पॉट जिओ ४जी प्रिव्ह्यू ऑफरसोबत देण्यात येत आहे. ज्याची किंमत आतापर्यंत २८९९ रूपये इतकी होती, आता ही किंमत १९९९ रूपये इतकी आहे.

रिलायंस जिओ सीमसोबत डिसेंबर महिन्यापर्यंत अनलिमिटेड ४जी, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फिचर्स देण्यात येत आहे. हे सीम तुम्ही खरेदी करू शकता, मात्र, त्यासाठी तुमच्याकडे ४जी स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. अशात अनेक लोक जिओ सीम खरेदी करत आहेत आणि आपला फोन वायफाय हॉटस्फॉटमध्ये कन्व्हर्ट करीत आहेत. या सुविधेसाठीच कंपनी जिओवायफाय विकत आहे. ज्याद्वारे तुम्हीही वायफाय झोन बनवू शकता. यात तुम्ही एकाचवेळी १० डिवाईस कनेक्ट करू शकता. त्यांना ४जी नेट देऊ शकता.

डिवाईसमध्ये २३०० एमएएमची बॅटरी आहे. जी फुल चार्ज झाल्यावर साधारण ५ तास बॅकअप देते. याची किंमत १९९९ रूपये इतकी झाली आहे. ज्यासोबत रिलायंस जिओ ४जी सीम दिले जाते. हे डिवाईस इतके लहान आहे की, आरामात तुम्ही तुमच्या खिशातही ठेऊ शकता. हे डिवाईस स्मार्ट टेलिव्हिजन, कंम्प्यूटर, लॅपटॉप, आणि मोबाईलला तुम्ही जोडू शकता.

Leave a Comment