बीएसएनएल देणार फक्त २४९ रुपयात ३०० जीबी डाटा

bsnl
नवी दिल्ली – बीएसएनएलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी फक्त २४९ रुपयात ३०० जीबी डाटा देणारी नवी योजना सादर केली असून बीएसएनएल एक रुपयापेक्षाही कमी किमतीत एक जीबी डाटा देणार आहे. बीएसएनएल ९ सप्टेंबरपासून ही योजना सुरु करत आहे.

ही योजना शहरी आणि ग्रामीण भागातील ब्राँडबॅन्ड ग्राहकांसाठी असणार आहे. या योजनेतंर्गत २४९ रुपयात ३०० जीबी डाटा डाउनलोड करता येणार आहे. बीएसएनएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. सी. पांडे यांनी सांगितले की, २४९ रुपयात ३०० जीबी डाटा या योजनेचा फायदा ६ महिने मिळणार आहे. दोन एमबीपीएसचा वेग सुरूवातीच्या १ जीबीसाठी मिळणार आहे. त्यानंतर १ एमबीपीएसचा वेग मिळणार आहे. एअरटेलनेही आपल्या दरांमध्ये ८० टक्के कपातीची घोषणा केली आहे. एअरटेल आता ५ जीबी डाटा ६५५ रुपयात देणार असून ३ जीबी डाटा ४५५ रुपयात देण्यात येणार आहे.

Leave a Comment