ऑनलाईन शॉपिंग- बनावट कंपन्यंाचा सुळसुळाट

fake
ऑनलाईन शॉपिंग व्यवसाय वेग पकडत असतानाच त्यातील धोकेही नजरेसमोर येऊ लागले आहेत. या कंपन्यातील २०० हून अधिक कंपन्या बनावट असल्याचा दावा केला जात असून या कंपन्यांची सरकारकडे कांहीही माहिती नाही तसेच या कंपन्यांची नोंदणीही झालेली नाही असे लक्षात आले आहे. वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारमण यांनी या संदर्भात डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अॅन्ड प्रमोशन या कंपन्यांवर नजर ठेवून असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात राज्य सरकारे, वाणिज्य मंत्रालय व वाणिज्य विभाग परस्पर सहकार्याने काम करत आहेत असेही त्या म्हणाल्या.

नामवंत ई कॉमर्स कंपन्यावर व्यवसाय करणार्‍या अनेक व्हेंडॉरनी या संदर्भात वाणिज्य मंत्रालय व संबंधित विभागात तक्रारी करून बनावट कंपन्या व्यवसाय करत असल्याचे लक्षात आणून दिले होते असे समजते. कंझ्युमर अफेअ्रर्स मंत्री रामविलास पास्वान यांनी अशा २०० बनावट कंपन्यांची यादीच सादर केली आहे. ग्राहक तक्रार संदर्भात या कंपन्यांकडे ई मेल केली गेली होती. त्यातील ४६ कंपन्यांनी त्याला कोणताही प्रतिसादच दिलेला नाही. सध्या भारतात या क्षेत्रासाठी मॉनिटरिंग सिस्टीम व रेग्युलेटरी बॉडी नाही त्याची व्यवस्था केली जावी अशीही व्हेंडॉरची मागणी आहे.

1 thought on “ऑनलाईन शॉपिंग- बनावट कंपन्यंाचा सुळसुळाट”

Leave a Comment