एअरटेलने स्वीकारले रिलायन्स जिओचे आव्हान

airtel
मुंबई – रिलायन्स जिओ विरोधात देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी एअरटेलने मोर्चा सुरू केला असून एअरटेल सुद्धा डेटा स्पीडसाठी जिओच्या मागे राहण्यास तयार नाही. यासाठी एअरटेलने मुंबई आणि केरळमध्ये कॅरिअर एग्रीगेशन टेक्नॉलॉजीची मदत घेतली असून ज्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या स्पेक्ट्रमला जोडून मोठा ब्लॉक तयार केला आहे. याच्या मदतीमुळे मोबाइल फोन युझर्सला सर्वाधिक आणि स्थिर ४जी इंटरनेट डेटा सर्व्हिस मिळणार आहे.

एअरटेलच्या सर्व्हिसमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून इंटरनेट डेटाची डाऊनलोड स्पीड १३५ एमबीपीएसपर्यंत पोहोचली आहे. ही स्पीड युजर्सला नॉर्मल ४जी नेटवर्कवर मिळणाऱ्या स्पीडपेक्षा सर्वाधिक आहे. यामुळे एअरटेल अन्य टेलिकॉम कंपनींच्या तुलनेत ४०-८० टक्के जास्त फास्ट ब्रॉडबँड स्पीड देण्याचा दावा करत आहे.

रिलायन्स जिओने स्पीडच्या या युद्धात वातावरण निर्मिती केली होती. त्यांनी म्हटले होते की, रिलायन्स इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त दर ठेवणार आहे. यानंतर भारती एअरटेल, व्होडोफोन इंडिया आणि आयडिया सेलुलर प्रीपेड कस्टमर्ससाठी डेटा टॅरिफमध्ये ६७ टक्के कपात केली आहे. याशिवाय एअरटेलने आपल्या काही पोस्टपेड डेटा पॅकसोबत फ्री आणि अनलिमिटेड वॉइस कॉल देखील दिला आहे. कंपनी काही प्लानमध्ये कमी किंमतीत डेटा प्रोव्हाइड करत आहे.

1 thought on “एअरटेलने स्वीकारले रिलायन्स जिओचे आव्हान”

Leave a Comment