आयएच १० केटी फ्रिवे -जगातला सर्वात रूंद हायवे

highway
जगातला आत्तापर्यंतचा सर्वात रूंद हायवे अमेरिकेच्या टेक्सास राज्यात असून या हायवेवर २५ हून अधिक लेन्स आहेत. त्यात १२ मेन, ८ फिडर व ६ मॅनेज लेन्सही आहेत. विशेष म्हणजे त्या दुसर्‍या हायवेशी इंटरकनेक्ट आहेत व त्यामुळे प्रवासी दुसर्‍या हायवेवरही सहजरित्या जाऊ शकतात. १३३ किमी लांबीच्या या हायवेचे नांव आहे आयएच १० केटी फ्री वे. उत्तर ह्यूस्टनमध्ये हा हायवे सर्वाधिक रूंद आहे.

या हायवेच्या सर्व लेनवर टोल बूथ आहेत. मात्र टोल भरण्यसाठी रांगा लागत नाहीत कारण त्यासाठी वाहनांना मुळी थांबावेच लागत नाही. रस्त्यावरील कॅमेरा वाहनांचे नंबर वाचून डेडा बेसकडे पाठवितो व तेथूनच मालकाला किती टोल द्यायचा त्याचे तिकीट मिळते.एखादे संशयास्पद वाहन असेल म्हणजे त्याची नंबर प्लेट डेटाबेसमध्ये मिळत नसेल तर तशी सूचना पोलिसांना मिळते व पोलिस ते वाहन थांबवितात.

१९८३ साली हा हायवे प्रवासाचा वेळ कमी व्हावा व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बांधला गेला. २००८ साली तेथे आणखीही सुविधा दिल्या गेल्या. टोरंटोत असा द-४०१ नावाचा २२ लेनचा हायवे आहे तर न्यूजर्सी मधील टर्नपाईक हा हायवे १८ लेनचा आहे.

Leave a Comment