आजपर्यंत आपण अनेक प्रकारच्या मोटरबाईक पाहिल्या असतील मात्र जर्मनीतील फ्रॅक डायस याने तयार केलेल्या बाईकची आपण कधी कल्पनाही केली नसेल. ही वेगळीच व वजनदार बाईक जेव्हा रस्त्यावर धावेल तेव्हा नवीन विक्रमाची नोंद केली जाईल. फ्रँकने ही बाईक स्क्रॅप मधून तयार केली आहे व त्याची नोंद गिनिज बुकमध्ये करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
वजनदार बाईक
फ्रँकने तयार केलेल्या या बाईकचे वजन आहे ९४० किलो. म्हणजे ही जगातील सर्वात वजनदार बाईक आहे. या बाईकसाठी वापरले गेलेले टायर ट्रॅक्टरच्या टायरपेक्षाही मोठे आहेत आणि हेच तिचे वैशिष्ठ आहे. फ्रँक ही बाईक ५०० यार्डांपर्यंत चालवू शकला तर ती जगातील सर्वात मोठी बाईक ठरणार आहे. सध्याचे सर्वात मोठ्या बाईकचे रेकॉर्ड बेल्जियमच्या जेफ पीटर्सच्या नावावर असून त्याने बनविलेली बाईक ८६० किलो वजनाची आहे.