लेनोव्हाचा नवा ४जी स्मार्टफोन लाँच

lenovo
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी लेनोव्हाने नवा ए६६०० ४जी हा स्मार्टफोन लाँच केला असून ६९९९ रुपये ऐवढी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे. सुरुवातीला हा स्मार्टफोन ३९९ रुपयांच्या डिस्काऊंटसह ६६०० रुपयात उपलब्ध करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले, मीडियाटेक क्वॉड कोर प्रोसेसर, माली टी७२० GPU ग्राफिक्ससाठी, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी, ८ मेगापिक्सल एलईडी फ्लॅशसह कॅमेरा देण्यात आला असून यात वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, एफएम आणि युएसबी पोर्ट कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment