सॅमसंगने जगभरातून परत मागवले २५ लाख गॅलक्सी नोट ७

samsung
मुंबई : जगभरातून सॅमसंग कंपनीने त्यांचे ‘गॅलक्सी नोट ७’ हे मोबाईल फोन परत मागवले आहेत. कंपनीने हे सर्व फोन चार्जिंग करताना बॅटऱ्यांचा स्फोट होत असल्यामुळे परत मागवण्याचा निर्णय घेतला असून जगभरातून २५ लाख फोन परत मागवले जाणार आहेत. त्याऐवजी दुसरे मोबाईल कंपनी ग्राहकांना देणार आहे. सध्या नवीन ‘गॅलक्सी नोट ७’ ची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

२आठवड्यांचा कालावधी फोनच्या निर्मितीदरम्यान झालेली चूक दुरुस्त होण्यास लागेल, त्यानंतर वितरकामार्फत नवीन फोन बाजारात आणले जातील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दक्षिण कोरियाई न्यूज एजन्सी योनहॅपने अशा पाच घटना जगभरात घडल्याचे सांगितलं होते, सॅमसंगने मात्र ३५ घटनांची माहिती मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment