ई-कॉमर्स कंपन्या लागल्या फेस्टिव्हल सेलच्या कामाला

e-commerce
नवी दिल्ली – देशातील अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील सारख्या मोठय़ा ई-कॉमर्स कंपन्यांनी सणासुदीच्या हंगामाची तयारी सुरू केली असून ई-कॉमर्स कंपन्यांनी यावेळी सणासुदीच्या विक्रीसाठी विक्रेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. कंपन्यांकडून विक्रेत्यांना पेडिटची ऑफर देण्याबरोबरच कमिशनमध्ये कपातीचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात सवलत देता यावी यासाठी असे केले जात आहे. तर कंपन्यांकडून विक्रेत्यांना कर्जाची सुविधा देखील दिली जात आहे.

आपली उत्पादने विकणा-या तिन्ही मोठय़ा कंपन्यांवर एका उत्पादकाने सणासुदीच्या आधी कंपन्या व्हेंडर्संना क्रेडिटची सुविधा देत असल्याचे सांगितले. हे क्रेडिट डिस्काउंट एवढेच आहे. व्हेंडर्स आपल्याकडून ऑनलाईफ प्लॅटफॉर्मवर डिस्काउंट देऊ शकतील यासाठी असे केले जात आहे. फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलकडून याप्रकारची सुविधा दिली जात आहे.

निवडक उत्पादकांना ई-कॉमर्स कंपन्यांकडून विशेष प्राधान्य दिले जात आहे. आगामी सणासुदीच्या काळासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या विक्रेत्यांना तयार केले जात असल्याचे अमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले. उत्पादकांना कंपनीच्या केंद्रावर उत्पादने नोंदणीकृत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

विक्रेत्यांनुसार मोठय़ा विक्रेत्यांचे कमिशन ५० टक्क्यांपर्यत कमी करण्याची तयारी अमेझॉनकडून केली जात आहे, यामागे ग्राहकांना याच हिशेबाने डिस्काउंटच्या योजना देण्याचा उद्देश आहे. तर जुन्या साठय़ाला प्रमोशनद्वारे संपविण्याचाही प्रयत्न केला जाईल. पुढील महिन्यात नव्या मोहिमेंतर्गत टीव्ही, युटय़ूब, प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडियावर प्रचार मोहीम सुरू केली जाईल. याशिवाय एक्सर्टनल इन्स्टॉलेशन आणि बिलबोर्डवर आउटडोर्स देखील मोहीम चालविली जाणार आहे. यासाठी २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला जाईल असे स्नॅपडीलच्या उपाध्यक्षा कनिका कालरा यांनी सांगितले.

Leave a Comment