लग्नाच्या ५२ वर्षानंतरही हे जोडपे घालते रोज सेम टू सेम कपडे

couple
नवी दिल्ली – सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याचा फोटो व्हायरल झाला असून गेल्या ५२ वर्षांपासून फ्रान आणि ईडी गारज्यूला हे जोडपे रोजच मँचिंग कपडे घालून वावरतात. हे जोडपे आठवड्यातून एकदा डान्स क्लासेसना जाताना मँचिंग कपडे घालून जायचे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना यांच्या मँचिंग कपड्यांचे कुतूहल असायचे पण एके दिवशी मात्र या जोडप्याने मँचिंग कपडे न घातल्यामुळे आज काय झाले मँचिंग कपडे न घालण्यास? असे सवाल आजूबाजूचे विचारायला लागले तेव्हापासून आठवड्यातून एकदा नाही तर रोजच मँचिंग कपडे घालण्याचा संकल्प या जोडप्याने केला.

हे जोडपे गेल्या दीड वर्षांपासून मँचिग कपडे घालत आहे. या जोडप्याच्या नातवाने त्यांच्या मँचिंग कपडे घातलेला फोटो ट्विटरवर टाकला आहे आणि दोन दिवसांत दररोज मँचिंग कपडे घालणा-या या वुद्ध जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या फोटोला त्याच्या ट्विटर अकाउंटवर ८१ हजार लाईक्स आहेत तर ३८ हजारांहूनही अधिक लोकांनी ही पोस्ट ट्विटरवर रिट्विट केली आहे.