रिलायंस जिओमध्ये पोर्टेबिलीटी शक्य!

reliance
मुंबई: नुकतीच रिलायंस कम्युनिकेशनने त्यांच्या जिओ या प्लॅनची घोषणा केली असून त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रिलायन्सची सेवा घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. तुमच्याकडे रिलायंसचा स्मार्टफोन नसेल किंवा तुमचा स्मार्टफोन हा ४जी असेल तरीही तुम्ही या ४जी सेवेचा लाभ घेऊ शकता.

तंत्रज्ञानविषयक माहिती देणाऱ्या एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, तुम्ही तुमचा नंबर रिलायंस जिओमध्ये पोर्ट करू शकता. यासोबतच जर तुम्हाला तुमचा सध्याच्या मोबाईल नंबर जिओमध्ये पोर्ट करायचा असेल तर तशीही सेवा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ही सेवा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर न बदलताही घेऊ शकता. त्यासाठी एक साधी सोपी पद्धत तुम्हाला करायची आहे. रिलायंसच्या या स्किमचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. सोबतच इतर कंपन्यांना मोठे नुकसान होणार आहे. कारण या स्किममध्ये व्हॉईस कॉलिंग मोफत असून केवळ इंटरनेट डेटासाठी पैसे मोजावे लागणार आहे. तेही फारच कमी दर असणार आहेत.

१) तुमच्या मोबाईल नंबरवरून तुम्ही तुमच्या सध्या सेवा देणा-या कंपनीला मॅसेज करा. टाईप करा < Port > < space> < mobile number >” आणि पाठवा १९०० या क्रमांकावर.

२) त्यानंतर तुम्हाला १९०१ या क्रमांकावरून एक युनिक पोर्ट कोड येईल. हा पोर्ट कोड १५ दिवसांसाठी व्हॅलिड असतो. त्या दिवसात तुम्ही रिलायंस जिओची सर्व्हिस घेऊ शकता.

३) त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या रिलायंस मोबाईल स्टोरमध्ये किंवा रिलायंस वर्ल्डमध्ये जाऊन एक कस्टमर अ‍ॅप्लिकेशन भरून द्या.

४) यासाठी तुम्हाला तुमचे अ‍ॅड्रेस प्रुफ, आयडेंटिटी आणि फॊटोग्राफ्स लागतील.

५) पुढच्या पाच दिवसात रिलायंस एक नवीन कार्ड इश्यू करेल आणि तुम्ही ही रिलायंसची सेवा घेऊ शकता. सहाव्या दिवशी तुम्ही तुमचे जुने कार्ड रिमुव्ह करून रिलायंसचे हे नवीन कार्ड स्मार्टफोनमध्ये टाकून या सेवेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

1 thought on “रिलायंस जिओमध्ये पोर्टेबिलीटी शक्य!”

Leave a Comment