आठवी पास डॉक्टर करत आहे दुर्गम भागातील नागरिकांवर उपचार

yusuf
अलीपुरद्वार- आजही देशातील दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याची बाब अनेकदा समोर येत असतात. आपल्या पध्दतीने प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या सुविधा सरकार उभारत असते. या सुविधा नागरिकांना उपलब्ध न झाल्यास ते अनेकदा कुठलेही वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या तथाकथित डॉक्टरांकडून उपचारही करुन घेत असतात.

यातील काही डॉक्टर तर अशी निष्णात तज्ञही करणार नाहीत अशा पध्दतीने उपचारही करतात. त्यामुळेच की काय लोकांचा त्यांच्यावर विश्वासही बसतो. पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार भागात असाच एक डॉक्टर काम करतो. त्याचे नाव डॉ. यूसुफ इलियास असे असून तो केवळ आठवी शिकला आहे. तो आपली शैक्षणिक पात्रता नसल्याचेही सांगतो. दुर्गम भागातील नागरिकांची गरज म्हणून आपण हे काम करत असल्याचे तो सांगतो. देशातील आरोग्य यंत्रणा सर्वसामान्यापर्यत पोहचत नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

Leave a Comment