लाईफ-टाईम रिलायन्स जिओचे फ्री कॉलिंग

reliance-jio
नवी दिल्लीः आज रिलायन्सची बहुप्रतिक्षित जिओ ४ जी सेवा लाँच झाली असून डिसेंबरपर्यंत जिओ सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एसटीडी कॉल्स आणि डाटा सेवा मोफत देण्यात येईल, अशी घोषणाही रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे.

मुकेश अंबानी यांनी मुंबईतील रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ ४ जी सेवा लाँच केली. लाँचिंगसोबत सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अंबानी यांनी मोठे गिफ्ट दिले आहे.

त्याचबरोबर त्यांनी जिओसोबत आयुष्यभरासाठी आऊटगोईंग, STD, लोकल कॉल लाईफटाईम फ्री,रोमिंग फ्री देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या दिवशी ब्लॅकआऊट डे नाही म्हणजे सण, उत्सवाला SMS, कॉल दर वाढणार नाही. विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के वाढीव डेटा देण्यात येईल. त्याचबरोबर डिसेंबरपर्यंत इंटरनेट डेटा मोफत आणि त्यानंतर केवळ ५० रुपयात १जीबी 4G डेटा देण्यात येईल.

काही स्मार्टफोन्ससाठी रिलायन्स जिओने खास 4G ऑफर आणली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. रात्री २ वाजल्यापासून लोक रांगा लावत आहेत. सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, असुस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.

3 thoughts on “लाईफ-टाईम रिलायन्स जिओचे फ्री कॉलिंग”

Leave a Comment