मालकाविनाच चालतात ही दुकाने

mizoram
कोणतेही दुकान म्हटले की त्याचा मालक, व्यवस्थापक, कर्मचारी वर्ग व भरीत भर म्हणजे सीसीटिव्ही कॅमेर्‍याची नजर हे दृष्य हमखास नजरेसमोर येते. दुकानात मालक नसेल तर दुकानाची काय हालत होईल हे शेंबडे पोरही सांगेल. मात्र या बाबतीत भारत बदलतोय हे नक्कीच.

मिझोराम हे नितांत सुंदर निसर्गसंपदेने नटलेले राज्य तसेच बंगलोर शहर या विधानाचा दाखला म्हणून देता येईल. मिझोराममधील नागरिक तर अंतर्बाह्य सुंदर असून मिझो नावाने ओळखले जातात. येथे हायवेवर असलेल्या दुकानातून वेगळेच दृष्य दिसते. म्हणजे दुकानात माल मांडलेला असतो पण दुकानात ना दुकानदार असतो ना दुकानावर सीसीटिव्हीची नजर असते. ही दुकाने म्हणजे चार फळ्यांवर मांडलेला भाजीपाला, फळे व अन्य सामान अशी असतात. सर्वसाधारणपणे छोटे शेतकरी त्यांचा माल अशा दुकानातून मांडतात व शेतकामासाठी जातात.

येथे येणारा ग्राहक दुकानात लिहून ठेवलेल्या दरानुसार आवश्यक गोष्टी खरेदी करतात, नेमके पैसे शेजारी ठेवलेल्या डब्यात टाकतात. सुट्या पैशांसाठी दुकानदार आणखी एक डबा ठेवतो. चुकूनही कधी चोरी मारी जाऊदेच पण कमी किंमत देऊन किंवा पैसे न देता माल नेल्याचा प्रकार येथे घडत नाही. प्रामाणिक पणाचे यापेक्षा चांगले उदाहरण कुठले असेल?

trust
मिझोरामचे सोडा. कर्नाटकातील बंगलोर येथेही असेच एक दुकान सुरू केले गेले आहे. ट्रस्ट शॉप असे त्याचे नांव आहे. येथेही दुकानमालक अथवा सीसीटिव्हीची नजर नाही. ग्राहक हवा तो माल घेतात त्याची लिहिली गेलेली किंमत देतात. कधी कधी तर पैसे नसतानाही माल नेतात व नंतर पैसे आणून देतात. म्हणजे दुकानदार व ग्राहक यांच्या परस्पर विश्वासावर हा व्यवसाय होतो. मग पटतेय का देश बदलतोय ते !

Leave a Comment