फिफ्थ जनरेशन ऑडी ए फोरची भारतात दस्तक

audia4
ऑडीची फिफ्थ जनरेशन ऑडी ए चार भारत प्रवेशास सज्ज झाली असून येत्या ८ सप्टेंबरला ती भारतात येत आहे. ऑडी प्रेमींसाठी ही चांगली बातमी आहे. युरोपात हे मॉडेल वर्षापूर्वीच सादर केले गेले आहे. या मॉडेलच्या मागच्या जनरेशनपेक्षा नवीन मॉडेल लांबी रूंदीला अधिक आहे तरीही ही गाडी मागच्या मॉडेलपेक्षा वजनाला साधारण १२० किलोंनी कमीच आहे.

या मॉडेलमध्ये टीएफएसआय पेट्रोल व टीडीआय डिझेल अशा दोन व्हरायटी असल्या तरी भारतात पेट्रोल व्हर्जनच सादर केले जाणार आहे. भारतात टीएफएसआय ३० पेट्रोल मॉडेल उपलब्ध करून दिले जात आहे. मॅट्रिक्स एलईडी हेडलाईटस, व्हर्च्युअल कॉकपिट, १२.३ इंची हायडेफिनेशन स्क्रीन, त्यात नेव्हीगेशन मॅपची सुविधा, एमएमआय इंफोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस फोन चार्जिंग, हवामान नियंत्रण सुविधा, अँड्राईड ऑटो व अॅपल कार प्ले सिस्टीम अशी त्याची फिचर्स आहेत. या कारची किंमत साधारण ४० लाख रूपयांपर्यंत असेल असे समजते.

Leave a Comment