एमबीएच्या ९३ टक्के विद्यार्थ्यांना नाही रोजगार

mba
मुंबई : ‘इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स’ने सादर केलेल्या अहवालात देशातील ९३ टक्के एमबीए ग्रॅज्युएट विद्यार्थी हे बेरोजगार असून, विद्यार्थी १० हजारपेक्षा कमी पगारावर कामाला लागतात, असा धक्कादायक उल्लेख करण्यात आला आहे.

या अहवालानुसार, दरवर्षी बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत चालली आहे. भारतातील बहुतांश एमबीएच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना योग्य सोई-सुविधा मिळत नाही. मागच्या वर्षी २२० एमबीए महाविद्यालये बंद पडले. येत्या वर्षांत १२० महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच ९० टक्के एमबीए ग्रॅज्युएट मुलांना १० हजारापेक्षा कमी पगारावर काम करावा लागतो. काही विद्यार्थ्यांना गणिताचे सामान्यज्ञानही नसते, असा धक्कादायक अहवाल चेंबर्सने दिले आहे.

Leave a Comment