आर्कोसचा सेल्फी फोकस्ड ५५ डायमंड स्मार्टफोन

archos
फ्रेंच कंपनी आर्कोसने त्यांचा नवा सेल्फी फोकस्ड स्मार्टफोन ५५ डायमंड सेल्फी नावाने युरेापमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत १९९.९९ युरो म्हणजे १५ हजार रूपयांच्या आसपास आहे. क्वालकॉमच्या क्विक चार्ज्ड टेक्नॉलॉजीने युक्त असलेल्या या फोनची बॅटरी ३००० एमएएच क्षमतेची आहे. सप्टेंबरपासून या फोनची विक्री सुरू होत आहे.

अन्य फिचर्समध्ये या फोनला ५.५ इंची फुल एचडी आयपीएस डिस्प्ले दिला गेला आहे.४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, फ्रंट व बॅक दोन्ही साईडला ड्रॅगनट्रेल ग्लास, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस दिली गेली आहे. फ्रंट कॅमेरा ८ एमपीचा आहे व कमी प्रकाशात फोटो काढताना स्क्रीन फ्लॅशचे काम करणार आहे. रिअर कॅमेरा १६ एमपीचा असून एलईडी फ्लॅशसह आहे. बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. कनेक्टीव्हीटीसाठी फोरजी, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस, अशी ऑप्शन्स आहेत. हा फोन कंपनीच्या वेबसाईटवर मिळू शकणार आहे.

Leave a Comment